ऋषिकेशमध्ये बंजी जंपिंग करताना रोप तुटला, तरुण 180 फूट उंचीवरून खाली कोसळला

उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये साहसी खेळादरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. बंजी जंपिंग करताना रोप तुटल्याने 24 वर्षीय तरुण 180 फूट उंचीवरून पडून गंभीर जखमी झाला आहे. सोनू कुमार असे जखमी तरुणाचे नाव आहे. तपोवन-शिवपुरी रोडवरील थ्रिल फॅक्टरी अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये बुधवारी ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

जखमी सोनू कुमार हा हरियाणातील गुरुग्रामचा रहिवासी आहे. त्याला तात्काळ एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सोनू साहसी खेळासाठी शिवपुरी येथे गेला होता. त्याने थ्रिल फॅक्टरी अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये बंजी जंपिंगचा प्रयत्न केला. यादरम्यान रोप तुटला आणि तो 180 फूटांवरून खाली टीनच्या शेडवर कोसळला.

या दुर्घटनेत सोनू गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.