धायरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

suicide

सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विनायक जालिंदर बंडगर (वय 23,रा. रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायकला दारूचे व्यसन होते. त्याचे आई वडील हे किराणा मालाचे दुकान चालवत असून गुरुवारी सायंकाळी तो मित्रांबरोबर बाहेर गेला होता. रात्री आठच्या सुमारास तो परत घरी आला त्यावेळी आई वडील दुकानात होते. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्याची आई घरी गेली. त्यावेळी त्यांनी बाहेरून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्याने पंख्याला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अशोक कदम करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या