प्रेयसीच्या भावाला खुश करण्यासाठी चोरल्या दुचाकी, पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

प्रेयसीच्या भावांना खुश करण्यासाठी जिल्ह्यातील माजरी येथील दोन युवकांनी दुचाकी चोरल्याचे प्रकरण समोर आले आहे. प्रेयसी मिळवण्यासाठी या युवकांनी लढवलेली ही शक्कल कमालीची मजेदार ठरली आहे. अब्रार अन्सारी आणि आकाश राजपूत अशी या प्रेमवीरांची नावं आहेत. त्यांनी आतापर्यंत 6 दुचाकी चोरल्या असून या सहाही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे. त्यांना मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे. हे तिघेही भद्रावती तालुक्यातील माजरी येथील रहिवासी आहेत. त्यांनी आणखी किती दुचाकी चोरल्या याचा तपास माजरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे करीत आहेत.