बेरोजगारीमुळे संतापलेल्या तरुणाचा काँग्रेस आमदारावर चाकूने हल्ला

770

बेरोजगारीमुळे संतापलेल्या एका तरुणाने आमदारावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. मकबूल पाशा (25) असं या हल्लेखोराचं नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नरसिंहराजा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार तन्वीर सैत (52) हे मैसूर येथील एका लग्नसमारंभासाठी आले होते. लग्नसोहळ्यात पाहुण्यांच्या खुर्चीवर बसलेले असताना तिथे अचानक मकबूल आला आणि त्याने चाकूने सैत यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सैत जबर जखमी झाले. त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने सैत यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. सैत यांच्यावर हल्ला केल्यानंतर पाशाने तिथून पळून जायचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी मकबूलची चौकशी केली असता सैत यांनी नोकरी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते त्यांनी पाळलं नाही, अशी कबुली दिली आहे. पोलिसांनी मकबूलविरुद्ध गुन्हा नोंदवला असून या हल्ल्यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या