लोकलमधून उडी मारून तरुणाची आत्महत्या

नेरळ स्थानकातून मुंबई दिशेला निघालेल्या लोकलमधून उडी मारून एका १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. महादेव चौधरी असे तरुणाचे नाव आहे. महादेव चौधरी हा कर्जतला फिरण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत पत्नी, लहान मुलगा, आई आणि काही मित्र होते. सर्वांनी घरी जाण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल पकडली. त्यावेळी महादेवचा कुटुंबासोबत किरकोळ वाद झाला. राग अनावर झाल्याने महादेवने ट्रेनमधून उडी मारली.