
मित्रांसोबत फोटो काढत असताना तोल गेल्याने समुद्रात पडून तरुणाचा मृत्यू झाला. अनिल राजपूत असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. अनिल हा शनिवारी सायंकाळी मित्रांसोबत जुहू चौपाटी येथे मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. मित्रांसोबत फोटो काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो समुद्रात पडला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. हा प्रकार गस्तीवर असलेल्या जीव रक्षकाच्या लक्षात आला. जीव रक्षकाने समुद्रात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्याला जीव रक्षकाने समुद्राबाहेर आणले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.