तुमसर शहरातील अनेक युवकांच्या युवासेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । तुमसर

ज्ञानेश्वरी कॉम्प्लेक्स येथे शहरातील अनेक तरुणांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होवून व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा युवकांचे प्रेरणास्थान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून युवासेनेत प्रवेश केला. यामध्ये शिवसेना प्रणित युवासेना तुमसर शहर प्रमुखपदी प्रवीण गुप्ता, उपशहर प्रमुखपदी कोमल श्रीवास यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे युवकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, शिवसैनिक अमित एच. मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत युवकांनी पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रवीण गुप्ता, संजू मासुलकर, सचिन लुटे, कोमल श्रीवास, महेंद्र राहांगडाले, अतुल हजारे, गौरव गायधने, रमेश वडसकर, प्रफुल पाटील, दिनेश धावळे, संजय पडोळे, शैलेश आंबिलडुके यांच्यासह अनेक तरुणांनी युवासेनेत प्रवेश केला.