पूर्ववैमनस्यातून तरुणाचा हात मनगटापासून तोडला, फरार झालेल्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून तरूणाला जिवे मारण्याच्या हेतूने त्याच्या डोक्यात आणि हातावर वार करून मनगटापासून पंजा तोडणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.

ही घटना 8 एप्रिलला दत्तनगर चौकात घडली होती. बाबाहरी ऊर्फ शांतीलाल गोरख सोनवणे (वय 33), विशाल गोरख सोनवणे (वय 30), सचिन सिताराम शिंदे (वय 26), सिद्धार्थ श्रीमंत ओव्हाळ (वय 19, सर्व रा. आंबेगाव-खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तय्युब खुदबुददीन शेख (वय 30 रा.कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

तय्युब शेख यांनी विशाल सोनवणे यांच्याकडून 15 हजार रूपये व्याजाने घेतले होते. मात्र, आरोपींनी त्यांच्याकडे 70 हजारांची मागणी केली. त्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी तय्युब यांच्यावर कोयत्याने वार केले. डावा हात मनगटापासून तोडून उजव्या हातावरही कोयत्याने वार केला होता. संबंधित फरार आरोपींची माहिती पोलीस अंमलदार राहूल तांबे आणि सचिन गाडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून टोळीला जेरबंद केले.