मालवणातील कांदळगावमध्ये तरुणाची आत्महत्या

445
well

मालवणातील कांदळगाव येथील दत्तात्रय अनंत राणे (वय 38) या तरुणाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलीस प्रशासनाने आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने मध्यरात्री विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.

विहिरीची खोली 50 फूट असल्याने तसेच विहरीत उतरण्यासाठी जागा नसल्याने स्थानिक हतबल झाले होते. मसुरे मालवण पोलीस ठाण्याचे प्रभारी हवालदार प्रमोद नाईक, पोलीस कर्मचारी फरांदे, जायभय यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन ग्रुप मालवणला रात्री 11.30 च्या सुमारास बोलण्यात आले. विहीर खूप खोल तसेच पाण्यात उतरण्यासाठी जागा नसल्याने मोहिमेत अडथळे आले. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या