आता यू-टय़ूबवर आपल्या भाषेत ‘सर्च’ करता येणार

यू-टय़ूब हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे व्हिडियो स्ट्रिमिंग अॅप आहे. गाणे, नृत्य, पाककला, शिक्षण अशा कोणत्याही विषयावरचे व्हिडियो यू-टय़ूबवर शोधले जातात आणि बघितले जातात. जगभरातील कोटय़वधी युजर्सच्या सोयीसाठी यू-टय़ूब नवनवीन फीचर आणते.

आताही जगाच्या कानाकोपऱयात विभिन्न भाषा बोलणाऱया युजर्ससाठी यू-टय़ूब खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार युजर्सला त्याच्या आवडीच्या भाषेत व्हिडियो सर्च करता येणार आहेत. या फीचरमुळे व्हिडिओचं शीर्षक, वर्णन, मथळे आदी गोष्टी आपोआप स्थानिक भाषेत भाषांतरित होऊ शकणार आहेत.

यू-टय़ूब भाषांतराच्या या नव्या फीचरची चाचणी करत आहे. यू-टय़ूब वेब आणि अॅपवर सध्या इंग्रजी भाषेतील मजकूर फक्त पोर्तुगीज भाषेत भाषांतरित होतो. लोक आपल्या स्थानिक भाषेत व्हिडियो शोधतात, तेव्हा त्यांना लवकरच या फीचरच्या मदतीने भाषांतरीत केलेल्या शीर्षकाच्या मदतीने लोकप्रिय चॅनेल बघता येईल.

नवीन फीचरमध्ये वेब ट्रान्सलेशन पॉप अॅप आहेत. या पॉप अॅपवर क्लिक केल्यावर किंवा टॅप केल्यावर युजर्सच्या स्थानिक भाषेत व्हिडियोचे शीर्षक, माहिती आणि कॅप्शन आपोआप भाषांतरीत होईल. सध्या यू-टय़ूबवर इंग्रजी भाषेत सर्च केल्यानंतर स्थानिक भाषेतील पंटेंट दिसतो, परंतु त्यात अचूकता नसते.

आपली प्रतिक्रिया द्या