
युटय़ूबने नुकतेच आपल्या ऍपचे नवीन व्हर्जन 20.22.1 जारी केले आहे. याचा सर्वाधिक फटका आयओएस 15 च्या खालील डिव्हाईसला बसणार असून यावर यूटय़ूब ऍप यापुढे चालणार नाही. त्यामुळे देशातील कोटय़वधी युजर्स अडचणीत आले आहेत. आयफोन 6 एस, आयफोन 6 एस प्लस, आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन एसई, आयपॉड टच, आयपॅड मिनी 4, आयपॅड एअर 2 या सर्व डिव्हाईसचा समावेश आहे. या सर्व डिव्हाईसवर युजर्स आता यूटय़ूब ऍप इन्स्टॉल करू शकणार नाहीत. ज्यांच्याकडे आधीच यूटय़ूब ऍप इन्स्टॉल आहे ते आता यापुढे मोबाइलमध्ये वापरू शकणार नाहीत.