पारसी समुदायाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने युट्यूबरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारसी समुदायाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने गावदेवी पोलिसांनी गोव्यातून एका युट्यूबरला अटक केली आहे. 29 वर्षांच्या या यूट्यूबरने त्याच्या यूट्यूब च२नेलवर पारसी समुदायाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

या प्रकरणी एफआयआर नोंदवत यूट्यूबरचे लोकेशन शोधून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी दिली. सैफउल्लाह कमर असे आरोपीचे नाव असून गोव्यातून त्याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा बिहारचा असून सध्या तो गोव्यात स्थायिक आहे.

चौकशीदरम्यान कमर याने केलेल्या टिप्पणीबाबत माफी मागितली असून पुन्हा असे करणार नसल्याची कबूली दिली आहे. दरम्यान ,कमर याचे यूट्यूब च२नेल ब्लॉक करण्याबाबत यूट्यूब अधिकाऱ्यांना सांगितल्याने पोलिसांकडून सांगण्यात आले.