हेरगिरी केल्याचा आरोप; यूट्यूबर जसबीरच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी ताब्यात असलेला पंजाबमधील यूट्यूबर जसबीर सिंगच्या कोठडीत मोहाली न्यायालयाने आज दोन दिवसांची वाढ केली. त्याला 4 जून रोजी अटक करण्यात आली होती. आज तीन दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने फक्त दोन दिवसांची परवानगी दिली. जसबीर हा एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कशी संबंधित आहे, ज्याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. तो केवळ पाकिस्तानी इंटेलिजेन्स ऑपरेटिव्ह शाकीर ऊर्फ रंधावा यांच्या संपका&त नव्हता, तर तो पाकिस्तान उच्चायोगाच्या एका अधिकाऱ्याच्याही संपका&त होता. त्या अधिकाऱ्याला अलीकडेच हिंदुस्थानातून हद्दपार करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.