
भाजप नेते युमनाम खेमचंद यांनी बुधवारी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली असून ते मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत नागा पिपल्स फ्रंटचे आमदार लोधी दिखो व कुकी समुदायाचे नेमचा किपगेन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या वर्षभरापासून राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या मणिपूरमध्ये वर्षभरानंतर पुन्हा सरकार स्थापन झाले आहे.
3 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मणिपूरच्या आमदारांची बैठक झाली होती. त्या बैठकीत युमनाम खेमचंद सिंह यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. युमनाम खेमचंद हे सिंग्जामेई मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. ते मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते मैतेई समुदायातील आहेत.




























































