युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठातील युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध शैक्षणिक विषयांवर आणि मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादाळाचा फटका कोकणातील विशेष करुन रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला बसला. यावेळी मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांना देखील त्याचा जबर फटका बसला असून अनेक महाविद्यालयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या महाविद्यालयांना मदत करावी, यासाठी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी आग्रही मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठाने या महाविद्यालयांना 56 लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या महाविद्यालयांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. त्यांनी या महाविद्यालयांना 100 संगणक मदत म्हणून देण्याचे जाहीर केले. या मदतीबद्दल शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानण्यासाठी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले.

या भेटीत मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, शीतल शेठ-देवरुखकर, राजन कोळंबेकर उपस्थित होते.