
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कलिना विधानसभेतील युवासेना युवती पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग युवा अधिकारी – संचिता गुरव, उपविभाग युवा अधिकारी – आरती सदरम, सुप्रिया भुरवणे, विधानसभा चिटणीस- नमिता खाके, रक्षंदा परब, विधानसभा समन्वयक – मानसी शिंदे. शाखा युवा अधिकारी – मृणाली जाधव (शाखा प्र. 88), श्रद्धा काजळकर (शाखा प्र.89), शाखा समन्वयक – रोनिका उपाध्याय (शाखा प्र.89), शाखा युवा अधिकारी – बबिता माने (शाखा प्र.90), स्मिता गायकर (शाखा प्र.91), सुप्रिया कांबळी (शाखा प्र.165), निहारीका पडवळ (शाखा प्र.166), उपशाखा युवा अधिकारी – मधुरा तारू (शाखा प्र.166), ईशा तारू (शाखा प्र.166), शाखा युवा अधिकारी – सायली कांदळकर (शाखा प्र.167), सायली माने (शाखा प्र.168).