आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बुलढाणा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी राज्यातील दुष्काळ लक्षात घेता बुलढाणा येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या दररोजच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तूंचे वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये गहू, तांदूळ, गोडेतेल, साखर, हरभरा डाळ, रवा यासह इतर जीवनावश्यक गोष्टींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता युवासेनेने दैनंदिन जीवनात आवश्यक गृहपयोगी वस्तूंचे वितरण आयोजित करून सोमवारी बुलढाणा, मेहकर येथे खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर (मेहकर मतदार संघ) यांच्या समवेत मदतीचा हात देऊ केला.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतले जिजाऊंचे दर्शन

सोमवारी आदित्य ठाकरे यांचे प्रथमच मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दौऱ्याच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांनी सिंदखेडराजा येथे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील माँ जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जालन्यात जंगी स्वागत