
सामना प्रतिनिधी । जालना
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे सोमवारी जालना येथे जंगी स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे हे विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असून ते संभाजीनगरहुन बुलढाणा येथे जात असताना शिवसेना युवासेनेच्या पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणाही दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे युवासेना उपसचिव अभिमन्यू खोतकर, युवासेना जिल्हा युवा अधिकरी भाऊसाहेब घुगे, तालुकप्रमुख संतोष मोहीते, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, युवासेना जिल्हा समन्वयक भरत सांबरे, युवासेना उप जिल्हाअधिकारी अमोल ठाकुर, युवासेना शहरप्रमुख राजू सलामपुरे दुर्गश काठोठीवाले, गोपाल काबलेय, अंकुश पाचफुले , अजय कदम नगरसेवक अशोक पवार, सागर पाटील, सुमित पाटील संतोष परलकर, निलेश शिंदे, अभिषेक काबले, कुणाल जाधव गणेश सोळुंके, सर्जेराव वाघ अनुज ढवळे ,दीपक राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

































































