एक्स गर्लफ्रेंडसोबत युवराजने केली पार्टी, फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

युवराज सिंगने शनिवारी त्याच्या रिटायरमेंटची मित्र मैत्रिणींना पार्टी दिली. या पार्टीला त्याची एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा देखील उपस्थित होती. त्या दोघांचे एकत्र पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्यासोबत युवराजची पत्नी हेजल किच देखील होती.

किम शर्मा व युवराज सिंहचे अनेक वर्ष अफेयर होते. युवराज किमसोबत लग्नही करणार होता. मात्र युवराजच्या आईला त्याचे लग्न मान्य नव्हते व त्यांच्या युवी व किमच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे ते दोघे वेगळे झाल्याचे समजते. त्यानंतर युवराज हेजल किचसोबत तर किम देखील एका परदेशी व्यावसायिकासोबत लग्नबंधनात अडकली. किमचे लग्न मात्र फार काळ टिकले नाही. सध्या किम ही हर्षवर्धन राणे या अभिनेत्याला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी युवराजने त्याच्या खास मित्रांसाठी त्याच्या रिटायरमेंटची पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला किम शर्मा, अनुषा दांडेकर, शिखर धवन, मानसी स्कॉट देखील उपस्थित होते.