मी माझ्या भूतकाळातून पुढे आलोय,पण…, धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्रने सोडलं मौन

कोरिओग्राफर, अभिनेत्री धनश्री वर्मा सध्या एका रिआलिटी शो मध्ये सहभागी झाली आहे. धनश्री या शोमध्ये अनेकदा तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलताना दिसते. धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटावर धनश्रीने आत्तापर्यंत मौन बाळगलं होतं. मात्र या शोमध्ये आल्यापासून ती अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसली. यावेळी तिने त्यांच्या नात्यांबद्दल बोलताना अनेक खुलासे केले. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यांतच युजवेंद्रनं तिची फसवणूक केल्याचं तिने म्हटलं. धनश्रीच्या या वक्तव्यावर आता युजवेंद्र चहलनेही मौन सोडलं आहे.

क्रिकेटर युजवेंद्र चहनने नुकताच हिंदुस्थान टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी त्याने धनश्रीने केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. “मी एक खेळाडू आहे आणि मी फसवणूक केलेली नाही. जर मी दोन महिन्यांतच चीट केलं असतं, तर इतके वर्ष आमचं रिलेशनशिप चाललं असतं का? त्यामुळे माझ्यासाठी धनश्री नावाचा चॅप्टर संपलाय… आणि आता मी माझ्या आयुष्यात खुप पुढे गेलोय. लोक अजून त्याच गोष्टी बोलतायत. अजूनही त्यांचं घर माझ्या नावामुळेच चालतंय… त्यामुळे ते बोलणं सुरूच ठेवतील. पण मला जराही फरक पडत नाही. आता हे शेवटचं, मी माझ्या आयुष्यातल्या त्या चॅप्टरवर बोलतोय…”, असं युजवेंद्र चहल म्हणाला.

युजवेंद्र पुढे म्हणाला की, सध्या मी फक्त माझ्या आयुष्यावर आणि माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करतोय… सोशल मीडियावर अनेक गोष्टी सुरू असतात. पण त्यातल्या खऱ्या गोष्टी ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. आता हा चॅप्टर माझ्यासाठी संपलाय. त्यामुळे या गोष्टीवर पुन्हा बोलण्याची माझी इच्छा नाही. सध्या मी सिंगल आहे. लग्न करण्याचा कोणताही विचार नाही, असे त्याने सांगितले.