
सामना ऑनलाईन, मुंबई
सानिया मिर्झापाठोपाठ झरीन खान ही देखील पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या प्रेमात पडल्याच्या अफवा पसरली होती. या अफवेला झरीन खाननेच उत्तर दिलं आहे. ट्विटरवर झरीन खानने हे वृत्त रिट्विट करत ‘बुलशीट’ या एका शब्दातच तिने सुनावले आहे.
Bullshit ! https://t.co/pIYj4Vu04L
— Zareen Khan (@zareen_khan) October 4, 2018
झरीन खान हिचे पाकिस्तानी फलंदाज फखर झमानशी प्रेमसंबंध असल्याचं या वृत्तात म्हटलं होतं. बरेच दिवस झरीन खान या अफवांबाबत गप्प बसून होती, मात्र या अफवा जरा जास्तच पसरायला लागल्यानंतर तिने ट्विटरचा आधार घेत उत्तर देण्याचं ठरवलं.




























































