नऊवारीत शेवंताची अदा, चाहते झाले फिदा!!

‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील सगळ्यांची लाडकी शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकतेच तिने नऊवारी साडीतील आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात अपूर्वा एका शेतामध्ये उभी राहून लाल रंगाच्या नऊवारी साडीत पोझ देताना दिसत आहे. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये ‘नऊवारी साडी परिधान करण्याचा अभिमान’ असं तिनं म्हटलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. सध्या ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये नुकतीच तिची एंट्री झाली आहे. या मालिकेत नाईकांच्या वाडय़ातील अनेक रहस्ये उलगडणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या