जाऊ बाई गावात… पिक्चर अजून बाकी आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोटय़ा पडद्यावर एका नवाकोरा अन् आगळावेगळा असा ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हार्दिक जोशी याने केले. या शोमध्ये शहरात आणि परदेशात लहानाच्या मोठय़ा झालेल्या काही तरुणी थेट गावात जाऊन कुठलीही सुविधा न वापरता तिथल्या लोकांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करत होत्या. या शोची रमशा फारुकी विजेती ठरली.

‘जाऊ बाई गावात’चा पूर्ण प्रवास प्रेक्षकांना 18 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजता पाहता येईल. यामध्ये हार्दिकचे सूत्रसंचालन, स्पर्धकांचा पूर्ण प्रवास, खास पाहुण्याची धमाल- मस्ती, मजेदार टास्क, गावकऱयांच्या गमतीजमती असतील. एक प्रकारे ‘जाऊ बाई गावात’ चा पिक्चरच असेल.