रात्रीस खेळ चाले घेणार निरोप; देवमाणूस येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते; पण त्याचा खरा चेहरा मात्र केगळाच असतो. चांगूलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱया अशा कृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका लवकरच झी मराठी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबडय़ा लोकांना आपल्या बोलघेवडय़ा स्वभावाने तो भुरळ पाडतो. अल्पकधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात मध्यवर्ती भूमिकेत किरण गायकवाड असणार आहे.

समाजातील अपप्रकृत्तींविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मालिका सादर करण्यात येत असून मालिकेचे चित्रिकरण साताऱयात होत आहे. ‘रात्रीस खेळ चाले-2’ ही मालिका निरोप घेणार असून 31 ऑगस्टपासून रात्री 10.30 वाजता झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.