
अवघ्या काही महिन्यांमध्ये घराघरात पोहोचलेल्या झेप्टोने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. 99 रुपये आणि 149 रुपयांमध्ये फ्री डिलिव्हरी असलेल्या ग्राहकांना आता थेट 199 रुपये मोजावे लागणार आहेत. फ्री डिलिव्हरीसाठी लागणारी मिनिमम ऑर्डर व्हॅल्यू आता वाढवण्यात आली आहे. देशातील काही शहरांमध्ये आणि पिनकोडमध्ये ही मर्यादा 149 रुपयांवरून थेट 199 रुपये करण्यात आली आहे.
199 रुपयांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आल्याने झेप्टो आता ब्लिंकिट आणि इंस्टामार्टच्या मिनिमम ऑर्डर व्हॅल्यूच्या जवळ पोहोचले आहे. यात जर एखाद्या परिसरात ऑर्डर्सची मागणी जास्त असते, अशा वेळी फ्री डिलिव्हरीसाठीची किमान ऑर्डर व्हॅल्यू तब्बल 299 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे आता ग्राहकांना अनावश्यक सामान खरेदी करावे लागणार आहे. याआधी झेप्टोने काही ग्राहकांसाठी ही मर्यादा 99 रुपयांवरून 149 रुपये केली होती. आता झेप्टोने यात पुन्हा एकदा वाढ केली आहे. झेप्टोच्या या निर्णयामुळे कमी किमतीच्या वस्तू ऑर्डर करणाऱया ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. तर ऑर्डरवरील खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे पंपनीचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे झेप्टोच्या नेट ऑर्डर व्हॅल्यूमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. झेप्टोच्या या निर्णयामुळे आता बाजारातील इतर पंपनीच्या स्पर्धकांनाही याचा फायदा होऊ शकतो. कारण, झेप्टोचे ऑर्डर शुल्क आता जवळपास इतर पंपन्यांच्या मिनिमम ऑर्डर व्हॅल्यू इतके झाले आहे.

























































