12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच

राज्यातील 12 जिल्हा परिषदांतील आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या आत असून त्या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि निवडणूक तयारीचा आढावा घेऊन लवकरच तेथे निवडणुका कधी घेणार याची घोषणा करण्यात येईल, असे आयोगाने सांगितले. त्यामुळे पुणे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशीव, अहिल्यानगर या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होतील हे स्पष्ट झाले.