बारावीची परीक्षा उद्यापासून, कोकण बोर्डात 26 हजार 800 परीक्षार्थी

बारावीच्या परीक्षांना उद्या दि.21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कोकण बोर्डात 61 केद्रांवर परीक्षा होणार आहेत. कोकण बोर्डामध्ये 26 हजार 800 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. उद्या सकाळी अकरा वाजता परीक्षेला प्रारंभ होणार असून पहिला इंग्रजीचा पेपर आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 38 केंद्रांवर परीक्षा होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 17 हजार 849 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सिंधुदुर्गामध्ये 23 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 हजार 951 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.