बर्फातून नवरीची ‘हटके’ एण्ट्री; 2222 फूट उंचावर पार पडला विवाह

आपला विवाह हटके व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. काहींची इच्छा पूर्ण होते. तर काहींची होत नाही. स्वित्झर्लंडमधील एका जोडप्याने मात्र आपला हटके पद्धतीने विवाह पार पाडला. बर्फाळ डोंगराळ भागात म्हणजेच समुद्रसपाटीपासून तब्बल 2 हजार 222 फूट उंच बर्फाच्या सानिध्यात लग्न करण्याची इच्छा पूर्ण केली आहे. या विवाह सोहळ्याचे पह्टो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. पह्टोत नवरी बर्फातून बाहेर येताना दिसत आहे. या विवाहाला विंटर वंडरलँड असे नाव दिले आहे. स्वित्झर्लंडच्या जर्मेटमध्ये लक्झरी स्की शॅलेट सोबत मॅटरहॉर्नसमोर नवरीची एण्ट्री एका बर्फाच्या तुकडय़ातून होतेय, आजूबाजूला सर्वत्र बर्फच बर्फ दिसत आहे. पांढऱया शुभ्र बर्फात संगिताची धून वाजवली जात आहे. या पोस्टवर अनेक यूजर्सनी कमेंट केल्या आहेत. लग्नासाठी सध्या प्री-वेड शूटची क्रेझ मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच जोडपे फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करण्यासाठी वेगवेगळे पर्यटन स्थळांना पसंती देत असतात. यासाठी लाखो रुपयेसुद्धा खर्च केले जातात.

सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद

या फोटोला आणि व्हिडीओला lebaneseweddings नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. या जोडप्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर येताच अवघ्या काही मिनिटांत व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिले आहे. फोटो आणि व्हिडीओ पाहून यूजर्स मजेदार कमेंट करत आहेत.