
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यावर बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात मोठय़ा प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आला आहे. पोलीस तपासात कुकडे यांच्या खात्यात मागील एक ते दीड वर्षात तब्बल 100 कोटी रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील 40 ते 50 कोटी रुपये कुकडेकडून इतर 20 ते 25 जणांच्या खात्यांमध्ये वळविण्यात आले आहेत. यामध्ये पावणेदोन कोटी रुपये कुकडे याच्या निकटवर्तीयाच्या खात्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह त्यांच्या मुलाच्या खात्यावर आले आहेत. या अनुषंगाने पोलिसांकडून मानकर यांचा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिली.