
कॅप फेरीच्या जाहीर झालेल्या दोन गुणवत्ता याद्या, त्याचसोबत सुरू असलेल्या कोटय़ातील प्रवेश प्रक्रियेद्वारे आतापर्यंत अकरावीचे 38.33 टक्के प्रवेशच झाले आहेत. 1 लाख 3 हजार 891 विद्यार्थ्यांनी अकरावीत आपला प्रवेश निश्चित केला असून अद्यापही तब्बल 2 लाख 77 हजार 544 म्हणजेच 72.76 टक्के जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 1 लाख 67 हजार 120 विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या आतापर्यंत दोन प्रवेश फेऱया झाल्या आहेत. पहिल्या फेरीतून 62 हजार 708, तर दुसऱया फेरीतून 18 हजार 763 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या प्रवेशानंतर ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱया गुणवत्ता यादीसाठी 1 लाख 58 हजार 457 जागा रिक्त आहेत.
प्रवेश न घेतल्याची कारणे
- दहावीनंतर अभियांत्रिकी, आयटीआय किंवा अन्य अभ्यासक्रमाकडे वळणे.
- कॅप फेरीमध्ये अलॉट झालेले कॉलेज आवडीचे नसल्यामुळे प्रवेश न घेणे.
- घेतलेला प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे.
शाखानिहाय झालेले प्रवेश
शाखा कॅप फेरी कोटा प्रवेश एकूण
आर्टस् 9870 2188 12,058
कॉमर्स 38,855 12,108 50,963
सायन्स 31,984 8018 40,002
एचसीव्हीसी 762 106 868
एकूण कॉलेज 1014
प्रवेश क्षमता 3,81,435
एकूण विद्यार्थी 2,71,011
प्रवेश घेतले 1,03,891 (38.33क)
रिक्त जागा 2,77,544 (72.76क)
प्रवेश घेतले नाहीत 1,67,120
कॅप फेरी, कोटय़ानुसार झालेले प्रवेश
- कॅप फेरी 81,471
- इनहाऊस 6247
- अल्पसंख्याक 15,057
- व्यवस्थापन 1116
12 जुलैला तिसरी गुणवत्ता यादी
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱया गुणवत्ता यादीबरोबरच कोटय़ातील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना 6 ते 9 जुलै या कालावधीत पहिल्या भागात दुरुस्ती करण्याबरोबरच पसंतीक्रम भरता येणार आहे. 12 जुलैला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना 14 जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहे.

























































