
कोल्हापूरात रविवारी सकाळपर्यंत आणखी नवे 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 720 वर पोहचली आहे. तर पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 616 झाली आहे. तर आतापर्यंत 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. रविवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह अहवालांमध्ये हातकणंगले-1, राधानगरी-2, शाहुवाडी तालुक्यातील-3 आणि कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील-1 येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 179 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.



























































