
हिंदुथानात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला आहे. या दरम्यान ग्रीज झोन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. देशात 3 मे पर्यंत कोरोनाचे 40 हजार 263 रुग्ण आढळले होते. तर 1 हजार 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत 10 हजार 18 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. तसेच केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
केरळमध्ये सध्या कोरोनाचे 95 रुग्ण आहेत. राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 401 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. शनिवारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले होते. केरळच्या कन्नूरमध्ये हे दोन रुग्ण आढळले असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली होती.

























































