डोळ्यांदेखत झाली होती आईची हत्या, १० वर्षांच्या मुलीच्या साक्षीमुळे खुन्याला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

डोळ्यासमोरच जन्मदात्या आईचा खून पाहणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलीच्या साक्षीमुळे तिच्या खुन्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. चार वर्षांपूर्वी एका तरुणाने दारूच्या नशेत या मुलीच्या आईची हत्या केली होती.

या घटनेत बळी गेलेली महानंदा (३२) ही दोन मुलं आणि सासूसोबत ठाण्यात होती. महानंदाच्या पतीने २०१३मध्ये आत्महत्या केल्यानंतर दोन्ही मुलांची सर्व जबाबदारी तिनेच उचलली होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या मंजुनाथ गुमास्ते (२६) याने महानंदासमोर अनेकदा प्रेमप्रस्ताव ठेवला होता. पण, महानंदाने त्याला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, तिच्या प्रेमात पागल झालेल्या मंजुनाथने ७ जानेवारी २०१४ रोजी रात्री दारूच्या नशेत तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करायला सुरुवात केली. महानंदाने त्याला विरोध करताच संतापलेल्या मंजुनाथने तिच्यावर चाकूचे वार करून तिची हत्या केली.

हा प्रसंग महानंदाची मुलं आणि सासूने पाहिला होता. त्यामुळे मंजुनाथने त्यांच्यावरही हल्ला केला. या घटनेत मुलगी बचावली, मात्र महानंदाची सासू आणि तिचा वर्षभराचा भाऊ जखमी झाले. या घटनेवेळी अवघी सहा वर्षांची असणाऱ्या या मुलीला जबर मानसिक धक्का बसला होता. मात्र, न्यायालयासमोर कोणत्याही दडपणाशिवाय तिने मंजुनाथविरुद्ध साक्ष दिली. तिच्या आणि अन्य साक्षीदार तसेच पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने मंजुनाथला जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

summary- 10 year olds tesitmony nails mothers killer