कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन सुरू आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आमदारांची बैठक घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्या जवळच्या आमदारांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. शिवकुमार यांच्यासोबत 100 हून अधिक आमदार आहेत आणि त्यांना बदल हवा आहे. तसेच आता जर मुख्यमंत्री बदलला नाही तर 2028 ला राज्यात फटका बसेल अशी भिती व्यक्त केली आहे.

शिवकुमार यांच्याशी संबंधित अनेक आमदारांनी सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटवून उर्वरित कार्यकाळासाठी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे आमदार इक्बाल हुसेन यांनीही शिवकुमार मुख्यमंत्री व्हावे अशी मागी केली आहे. अनेक आमदारांची ही इच्छा असून राज्याला चांगले प्रशासन मिळावे म्हणून शिवकुमार यांना संधी मिळावी अशी प्रतिक्रिया हुसेन यांनी व्यक्त केली आहे. तसेच सुरजेवाला यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहे. जर आता हे बदल झाले नाही तर 2028 साली काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही असे बाकित हुसेन यांनी केले आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्री कुणाला करणार हा निर्णय फक्त हायकमांड घेणार अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिली आहे. तसेच सुरजेवाला यांनीही हा दौरा संघटनात्मक बदलासाठी असल्याचे म्हटले आहे.