
देशभरात सध्या वापरात असलेल्या 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा लवकरच चलनातून बाद होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु रिझर्व्ह बँकेने अशा कुठलाच प्रकारचा निर्णय घेतला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
एक खबर में दावा किया जा रहा है कि आरबीआई द्वारा दी गई जानकारी के अनुसार मार्च 2021 के बाद 5, 10 और 100 रुपए के पुराने नोट नहीं चलेंगे।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। @RBI ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/WiuRd2q9V3
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 24, 2021
जुन्या 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा जुन्या नोटा लवकरचा चलनातून बाद होतील असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसारित झाले होते. त्यासंदर्भातील चाचपणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केली असून येत्या मार्च, एप्रिलपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी 22 जानेवारी रोजी दिली होती. रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना या सर्व नोटा गोळा करण्याची सूचना केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु या नोटा बाद करण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकारचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे.