
सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत. 24 कॅरेट सोने 1429 रुपयांनी तर चांदी 8 हजार 429 रुपयांनी घसरली आहे. चांदीच्या किमतीत या महिन्यात तब्बल 17 हजारांनी घसरल्याने चांदीची किंमत प्रति किलो 1 लाख 69 हजारांपर्यंत खाली आली आहे. तर सोने 6 हजार रुपयांनी घसरले आहे. 30 ऑक्टोबरला चांदी 1 लाख 86 हजार रुपये प्रति किलो, तर सोने 1 लाख 40 हजार रुपये तोळा होते. या वर्षी सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरू आहे.
यूएसच्या व्हल्कन रॉकेटचा स्फोट
बोइंग आणि लॉकहीड मार्टिनची संयुक्त कंपनी युनायटेड लाँच अलायन्सचे व्हल्कन रॉकेट रविवारी फ्लोरिडाहून प्रक्षेपणानंतर अवघ्या 10 मिनिटांतच निकामी झाले. या रॉकेटमधून अमेझॉनच्या एलईओ ब्रॉडबँड इंटरनेट युनिटसाठी 40 उपग्रह नेले जात होते. तेही रॉकेटच्या स्फोटात नष्ट झाले. व्हल्कन रॉकेटचे हे केवळ पाचवे उड्डाण आणि 9 महिन्यांनंतरचे पहिले उड्डाण होते.



























































