1000 मीटर लांबीचा तिरंगा हाती घेत नागरिकांचे सीएए, एनआरसीला समर्थन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
caa-nrc-support

सीएए, एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ धारूर येथे आज बीड जिल्ह्यातील पहिलीच भव्य रॅली काढण्यात आली. गावातील देशभक्त नागरिकांनी या रॅलीचे आयोजन केले होते. एक हजार मिटर लांबीचा तिरंगा हातात घेऊन नागरिकांनी सीएए,एनआरसी कायद्याच्या समर्थन केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीच्या घोषणांनी धारूर शहर दुमदुमून गेले होते.

ही रॅली छत्रपती शिवाजी चौक, क्रांती चौक, काशीनाथ चौक मार्गे तहसील कार्यालय येथे संपली. रॅलीनंतर सीएए, एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले.

आजवर जिल्हाभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मोर्चे, आंदोलन करण्यात आले. मात्र समर्थनार्थ एकही रॅली जिल्ह्यात काढण्यात आलेली नव्हती. सोमवारी धारूरमध्ये 1000 मिटरचा तिरंगा हातात घेऊन निघालेली पहिलीच रॅली ठरली. आज काढलेल्या रॅलीत सामाजिक संघटना, नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते.