7 व 8 जानेवारीला अकोल्यात मराठी गझल संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन येत्या 7 व 8 जानेवारी रोजी अकोला येथे आयोजित करण्यात आले असून माय मराठीच्या साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलेचे सूर यानिमित्ताने आणखी बुलंद होणार आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून सृप्रसिद्ध कवी, ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची निवड करण्यात आली आहे तर सुप्रसिद्ध कवी आणि सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत, अशी माहिती गझल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस लॉन्स येथे हे दोनदिवसीय गझल संमेलन पार पडणार आहे. गझल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी, अकोला यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवार उपस्थित राहणार आहेत.