11 दिवसांत 722 सील इमारती वाढल्या, मुंबईतील इमारतींमध्ये ‘प्रतिबंध’ कडक!

1439

मुंबईत सध्या झोपडपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आढळत असल्यामुळे पालिकेने आता इमारतींमध्ये ‘प्रतिबंध’ कडक करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गेल्या 11 दिवसांत ‘सील’ करण्यात आलेल्या इमारती-इमारतींच्या क्षेत्रांमध्ये तब्बल 722 इतकी वाढ झाली आहे. तर कंटेनमेंट झोनमध्ये फक्त एकने वाढ झाली आहे.

मुंबईत 9 जुलैपर्यंत एकूण रुग्णसंख्या 88795 गेली असली तरी 59 हजार 751 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 23 हजार 915 सक्रिय रुग्ण असून यातील 80 टक्के रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67 टक्क्यांवर गेले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये मास्क न घालणाऱयांना एक हजाराचा दंड करण्यात येत असून नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. मे महिन्याच्या शेकटच्या आठकडय़ात मुंबईत 3097 इमारती सील तर 696 बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. परंतु 3 जूनपासून लॉक डाऊन टप्याटप्याने खुले करण्यास सुरुकात झाल्यानंतर या आकडेकारीतही काढ होताना दिसून येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठकडय़ात 798 बाधित क्षेत्र तर 4538 इमारती सील केल्या होत्या. दरम्यान, 9 जुलैपर्यंत मुंबईत 5129 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये फक्त एकने वाढ
पालिकेने 29 जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 750 कंटेनमेंट झोन होते. यामध्ये झोपटपट्टी विभागांचा समावेश सर्वाधिक आहे. गेल्या 11 दिवसांत फक्त एक कंटेनमेंट झोन वाढला आहे. यामध्ये 9 लाख 96 हजार 811 घरे असून 42 लाख 83 हजार 788 लोखसंख्या आहेत. या भागात आतापर्यंत 28 हजार 575 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर सील केलेल्या 6597 इमारती-इमारतींच्या भागांमध्ये 2 लाख 79 हजार 101 घरे असून 9 लाख 77 हजार 774 लोकसंख्या आहे. या भागात आतापर्यंत 18 हजार 745 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

‘सील’ इमारतीमधील आघाडीचे विभाग
आर मध्य – बोरिवली – 793
के पूर्व – अंधेरी पूर्व – 789
आर दक्षिण – कांदिवली – 535
एफ उत्तर – वडाळा – 532
टी – मुलुंड – 560

आपली प्रतिक्रिया द्या