धक्कादायक ! राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील 11 हिंदू निर्वासितांची आत्महत्या

1299

राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील 11 सदस्यांनी आत्महत्या केली आहे. सर्व सदस्य पाकिस्तानातून हिंदुस्थानात आश्रयासाठी आले होते. जोधपुरच्या एका गावातील शेतात सर्व सदस्यांचे मृतदेह सापडले आहेत. सदर कुटुंब हिंदू असून पाकिस्तानातून आले होते. या कुटुंबातील एक सदस्य जिवंत असून त्याची चौकशी सुरू आहे.

जोधपुरमध्ये एक हिंदु कुटुंबीय पाकिस्तानहून राजस्थानमध्ये स्थायिक झाले होते. त्यांनी हिंदुस्थानमध्ये आश्रय घेतला होता. तसेच जोधपुरमध्ये ते शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी केमिकल पिऊन कुटुंबातील 11 सदस्यांनी आत्महत्या केली. शेतात सर्व सदस्यांचे मृतदेह सापडले. या कुटुंबातील एक व्यक्ती जिवंत आहे. तसेच आपल्या कुटुंबीयांनी असे पाऊल का उचलले हे त्यांनाही माहित नाही.

या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ज्या भागात मृतदेह आढळले त्या भागात केमिकलचा वास येत होता. या केमिकलचे सेवन केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झालाच अंदाज पोलिसांनी व्यक्त केल आहे. घटनास्थळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार या कुटुंबाच्या काही सदस्यांमध्ये भांडणे झाली होती. पण त्याचे कारण अद्याप कळालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या