
राज्यात बुधवारी एकाच दिवशी 105 कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र, गुरुवारी रुग्ण संख्या कमी होऊन 98 वर आली होती. मात्र, आज दिवसभरात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात 114 रुग्ण सापडले तर एका 47 वर्षांच्या महिलाचा मृत्यू झाला.
कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या महिलेला ताप तसेच श्वसनाचा आजार होता. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात 15 हजार 510 चाचण्या झाल्या असून 1 हजार 276 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सध्या 577 सक्रिय रुग्ण आहेत तर 681 रुग्ण बरे झाले आहेत. एकटय़ा मुंबईत आतापर्यंत 612 कोरोना रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, देशभरात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 364 वर गेली आहे.