
अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाचे 116 रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण चांदूर बाजार तालुक्यात आढळून आल आहे. आज रात्री प्राप्त अहवालानुसार एकट्या चांदूर बाजार तालुक्यात 18 रुग्ण आदळून आले. तर अचलपूर तालुक्यात सुध्दा कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यात आता पर्यंत 4 हजार 45 रुग्णांची नोंद झाली आहे.
आज अचलपूर तालुक्यात 10 रुग्ण आढळून आले असून तीच परिस्थिती चांदूर बाजार तालुक्यात सुध्दा दिसून येत आहे. या व्यतिरिक्त मोर्शी तालुक्यात दर्यापूर व भातकुली तालुक्यात सुध्दा कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसुन येत आहेत. मोर्शी येथे तीन रुग्ण आढळून आले असून अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागात असेच रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील प्रिया टाउनशिपमध्ये एकाच वेळी पाच रुग्ण आढळून आले असून, अमरावती शहरात सुध्दा रुग्णांची तीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा किमान 5 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील अशी शंका व्यक्त होत असल्यामुळे पुन्हा अमरावतीत संचारबंदी लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी आगामी काही काळात सार्वजनिक उत्सव साजरे होणार नाहीत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा मनपाच्या वतीने आज रात्रीच बैठक झाली असून संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मनपा प्रशासनाने सांगितले आहे.




























































