
अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले असून यानुसर विद्यार्थ्यांना 30 मेपासून ऑनलाईन अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. त्यापूर्वी 23 ते 27 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सरावही करता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांना यंदा केंद्रीय प्रवेश फेऱ्यांमधून किंवा कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधून प्रवेश घेता येणार आहे. भाग 1 भरून पासकर्ड सेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व फेरीच्यावेळी अर्जाचा भाग 2 भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कॉलेजांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत.
कसे होणार प्रवेश
कोटा बिगर अल्पसंख्याक अल्पसंख्याक विद्यालये
केंद्रीय फेरी 85 टक्के 35 टक्के
संस्थांतर्गत 10टक्के 10 टक्के
क्यकस्थापन 5 टक्के 5 टक्के
अल्पसंख्याक लागू नाही 50 टक्के
असे असेल वेळापत्रक
- किद्यार्थ्यांना संकेतस्थळाकर नोंदणी सराव – 23 ते 27 मे
- ऑनलाइन नोंदणी व प्रकेश अर्ज भाग 1 भरणे लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळविणे – 30 मेपासून पुढे
- अर्जाचा भाग 2 भरणे – दहावीच्या निकालानंतर




























































