
राज्यातील 12 अपर पोलीस आयुक्तांच्या बदल्या तसेच 14 उपायुक्तांना बढती देत त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज गृहविभागाने जारी केले. शशीकुमार मीना हे मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे, विक्रम देशमाने हे मध्य प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त तर शैलेश बलकवडे हे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त असतील. तर लोहमार्ग पोलीस आयुक्त पद अवनत करून राकेश कलासागर यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
12 अपर पोलीस आयुक्तांच्या नव्याने नियुक्त्या
अनिल पारसकर- संरक्षण व सुरक्षा (मुंबई), शैलेश बलकवडे- गुन्हे शाखा (मुंबई), एम.रामकुमार- महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे (संचालक), शशीकुमार मीना- उत्तर प्रादेशिक विभाग (मुंबई), प्रवीण पाटील- नागपूर शहर, संजय पाटील- पुणे शहर, वसंत परदेशी-नागपूर शहर, एस.डी. आव्हाड- पिंपरी चिंचवड, एस.टी.राठोड- अमली पदार्थ विरोधी स्टास्क फोर्स, पी.पी. शेवाळे- दहशतवाद विरोधी पथक, ए.एच. चावरिया- पोलीस आयुक्त अमरावती शहर (पद अवनत करून), विनिता साहू- सशस्त्र पोलीस दल (मुंबई).
14 वरिष्ठ उपायुक्तांना अपर आयुक्तपदी बढती व नियुक्ती
प्रसाद अक्कानवरू- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, पंकज देशमुख- पुणे शहर, अमोघ गावकर- राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन-पुणे), जी. श्रीधर- पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग (पुणे), मोक्षदा पाटील- राज्य राखीव पोलीस बल (मुंबई), राकेश कलासागर- पोलीस आयुक्त लोहमार्ग (पद अवनत करून), प्रियंका नारनवरे- वाहतूक (मुंबई), अरविंद साळवे- महाराष्ट्र पोलीस अकादमी (नाशिक), सुरेश मेंगडे- मुख्य दक्षता अधिकारी (सिडको), धनंजय कुलकर्णी- विशेष शाखा (मुंबई), विजय मगर- राज्य राखीव पोलीस बल, पुणे (पद अवनत करून), राजेश बनसोडे- पुणे शहर, विक्रम देशमाने- मध्य प्रादेशिक विभाग (मुंबई), राजेंद्र दाभाडे- नागपूर शहर.