12 हिंदुस्थानींना अटक

 

ब्रिटनमध्ये व्हिसाच्या शर्तींचे उल्लंघन केल्या प्रकरणी तसेच केक फॅक्टरीत अवैधरित्या काम केल्याच्या संशयावरून 12 हिंदुस्थानी नागरिकांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 11 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. ब्रिटनने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड्समध्ये एका कारखान्यावर छापा मारल्यानंतर ही अटक करण्यात आली. या सर्वांवर व्हिसाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.