नगर जिल्ह्यात बारा लाख बालकांना गोवर रुबेला लस

29

सामना प्रतिनिधी । नगर 

आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात राबवण्यात येत असलेल्या गोवर व रुबेला लसीकरणास नगर जिल्ह्यात चांगला प्रतिासाद मिळत आहे. या मोहिमेत आतापर्यंत 11 लाख 75 हजार 744 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील जवळपास 12 लाख 26 हजार 329 बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.

केंद्र सरकारने 2020 पर्यंत गोवर आजाराचे निर्मूलन आणि रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट निश्‍चित केले आहे. त्यानुसार गोवर व रुबेला लस विविध राज्यांतील नियमित लसीकरणात समाविष्ट करण्यात येत आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्यात लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत 15 वर्षांपर्यंतच्या बालकांना लस दिली जात आहे. नगर जिल्ह्यातील बारा लाख बालकांना लस दिली जाणार आहे. या मोहिमेत आतापर्यंत 11 लाख 75 हजार बालकांना लस देण्यात आली आहे. उर्वरित बालकांचेही लसीकरण केले जात आहे.

या मोहिमेत 28 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 11 लाख 75 हजार बालकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील 67 हजार 184, श्रीगोंदे 81 हजार 357, कर्जत 67 हजार 055, जामखेड 46 हजार 788, पारनेर 76 हजार 526, श्रीरामपूर 48 हजार 650, अकोले 71 हजार 018, शेवगाव 74 हजार 334, नेवासे 98 हजार 521, नगर 82 हजार 987, राहुरी 80 हजार 636, संगमनेर 1 लाख 18 हजार 152, राहाता 71 हजार 749, कोपरगाव 66 हजार 826 तसेच जिल्हा रुग्णालयामार्फत 1 लाख 23 हजार 961 अशा एकूण 11 लाख 75 हजार 744 बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. जिल्ह्यात एकूण उद्दीष्टाच्या 94.97 टक्के इतके लसीकरण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या