बेस्टमध्ये 12 मीटर लांबीच्या एसी इलेक्ट्रिक बस दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी 12 मीटर लांबीच्या मोठ्या आकाराच्या इलेक्ट्रिक बसचा पहिला स्लॉट अखेर बेस्टच्या ताफ्यात सामाविष्ठ करण्यात आला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात 386 इलेक्ट्रिक एसी बसेस असून त्यात 21 आसनी मिनी बसेस आणि 44 आसनी मिडी बसेस आहेत. त्यात आणखीन 2100 ई-बसेसचे 3675 कोटींचे टेंडर मे महिन्यात मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला आठ बसेसचा स्लॉट बेस्टच्या ताफ्यात आला आहे.

   बेस्टने 2025 पर्यंत ताफ्यात 70 टक्के इलेक्ट्रीक बसेस आणण्याचे ध्येय ठेवले आहे. आता 386 ई-बसेस सेवा देत असून आणखी 2100 ई-बसेससाठी 3675 कोटीचे टेंडर ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने जिंकले असून वर्षभरात या बसेस टप्प्या टप्प्याने ताफ्यात समाविष्ठ होणार आहेत. या बस 39 आसनी असून उभे प्रवासी जमेस धरता 54 प्रवासी यातून प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे  मुंबईकरांना वायू व ध्वनी प्रदूषणापासून

   विमानतळ ते खारघर बस दर 50 मिनिटांनी

   छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर दरम्यान सुरू झालेली बेस्टची एसी बससेवा आता दर 90 मिनिटांऐवजी दर 50 मिनिटांना एक फेरी अशी अशी सेवा देणार आहे. बेस्टने दि. 11 जुलैपासून विमानतळ प्रवाशांच्या सेवेकरिता वातानुकूलित बस सुरू केली आहे. ही बस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून पाम बीच मार्ग, एन. आय. आर. कॉम्प्लेक्स, सी वुड, नवी मुंबई पालिका मुख्यालय, कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर मार्गे जलवायू विहार ते खारघरपर्यंत दिवसांचे 24 तास सुरू असून ती ‘एअरपोर्ट सेवा – 2’ नावाने सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीनूसार 15 जुलैपासून या बससेवेची फेरी दर 90 मिनिटांऐवजी दर 50 मिनिटांनी चालविण्यात येणार आहे. या वातानुकूलित एअरपोर्ट सेवा-2 बसचे तिकीट बुक करण्यासाठी बेस्टच्या चलो अ‍ॅप, बेस्ट चलो बसस्मार्टकार्ड आणि नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्डचा (एनसीएमसी )वापर करता येईल असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.