कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या 12 वर्षांच्या सिद्धार्षचे उत्साहात स्वागत

317

संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक, शिंदे वाडी या गावातील 12 वर्षाचा सिद्धार्ष जगन्नाथ माने हा कोरोनावर मात करत घरी परतला आहे. घरी परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील, आरोग्य सेवक- सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस,गावकरी आणि मुलाचे आई-वडील उपस्थित होते. कोरोनाशी झुंज देऊन घरी परतलेल्या अदिती जगन्नाथ माने (वय 18) हिचा सिद्धार्ष हा लहान भाऊ आहे. त्या दोघांनी कोरोनावर मात केल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्या दोघावर रत्नागिरी कोविड सेंटरमधे उपचार सुरु होते. कोरोनावर मात करून ते दोघे भावंडे आता घरी परतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या