
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशाने 122 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी 82 लाख 86 हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या डोसची एकूण संख्या 121 कोटी 94 लाखांच्या वर गेली. रविवारी सकाळपासून 18 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 11 कोटी 16 लाख 98 हजार 526 डोस लाभार्थ्यांना दिल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 98 पूर्णांक 34 शतांश टक्के
देशात कोविड 19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 98 पूर्णांक 34 शतांश टक्के झाला आहे. शनिवारी देशभरात 9 हजार 481 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 98 हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी 8 हजार 774 नवे रुग्ण आढळले. देशभरात सध्या 1 लाख 5 हजार अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत बाधीत झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 31 शतांश टक्के आहे.





























































