
पाकिस्तानच्या सिंद प्रांतात सव्वाशे वर्ष जुने असलेले एक शिवमंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले आहे. हे मंदिर भाविकांसाठी खुले जाणार असून देशातील अनेक जुनी मंदिरेही दुरुस्त होणार आहेत.
पाकिस्तानाक काही दिवसांपूर्वी काही कट्टरपथींयांनी एक जुने मंदिर तोडले होते. यावरून हिंदुस्थानने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रामध्ये खडे बोल सुनावले होते.
पाकिस्तानमधीएल अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांची देखभाल करणार्या संस्थेने नुकतंच देशातील 12 हून अधिक मंदिरांचे जीर्णद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सिंध प्रांतातील हैदराबादमधील 126 वर्षे जुने शिव मंदिर दुरुस्त करण्यात आले. या मंदिराला गोस्वामी पुरुषोत्तम घर निहाल म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. शासनाने हे मंदिर दुरुस्त केले असून एका हिंदू संस्थेला सुपुर्द करण्यात आले.
या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक मंदिरांच्या डागडुजीचे काम सरकारने हाती घेतले आहे. त्यामध्ये सियालकोटमधील एक हजार वर्षे जुने शावला तेज मंदिराचाही समावेश आहे. फक्त मंदिरच नाही तर मंदिराचा आजूबाजूचा परिसरही विकसित आणि सुशोभित करण्यात येणार आहे.




























































